नीरा : नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात अशी नागरिकांची तक्रार होती. याची दखल घेत अचानकपणे गुरुवारी ( दि.२३) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मंगळवारी (दि.२३) रात्रीच्या वेळी अचानक भेट देऊन नीरा प्रा. आरोग्य केंद्राची पाहणी केली.
त्यावेळी दोन्ही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. त्यानंतर काही वेळाने संबंधित वैद्यकीय अधिकारी आले. तसेच आरोग्य केंद्रात चार शिपाई असताना देखील प्रा. आ. केंद्राच्या परिसरात धुळीचे साम्राज्य तसेच स्वच्छतागृहेही अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळून आल्याने डॉ. पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कामावर हजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चोवीस तास वैद्यकीय व आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक असताना तरी देखील वैद्यकीय अधिकारी याचे गांभीर्य न ठेवता बेजाबाबदार पणे वागत असल्याचा निष्कर्ष जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी काढला आहे.
या सर्व बाबींचा शेरा पुस्तकात नोंद केली असून तीन दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी साांगितले.नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा उंचविण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. प्रा.आ.केंद्रात स्वच्छता व रेकॉर्ड अपडेट ठेवण्यासाठी, रुग्ण सेवेचा प्रोटोकोल पाळण्याच्या सुचना संबंधिताना दिल्या असून तीन दिवसांत संबंधित वैद्यकीय अधिकार्यांना खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.
– डॉ. भगवान पवार,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. प