नीरा बंद नाही लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका

पुरंदर, दि. ८ जुलै २०२०: नीरा शहराच्या जवळपास पिंपरे (खंडाळा) वाल्हे व तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्याने नीरा बाजारपेठ बंद होणार असल्याची अफवा पसरत होती. मात्र नीरा ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी नीरा शहर तूर्तास बंद राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गरज पडल्यासच पुढील काळात तालुका तीन दिवस बंद केला जाईल व त्या पुर्वी लोकांना याबाबत कल्पना दिली जाईल.

निरा येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज कोवीड व्यवस्थापन कमिटी, निवडक नागरिक, व्यापारी, पोलीस व पत्रकार यांच्या उपस्थितीत कोरोना व्यवस्थापन संदर्भात करावयाच्या उपाययोजनांनबाबत एक बैठक घेण्यात आली. यामध्ये तूर्तास नीरा बाजारपेठ बंद करण्याची आवश्यकता नसून लोकांनी सोशल डिस्टन्स पाळत आपले व्यवहार सुरू ठेवावेत. असे ठरले आहे.

त्यामुळे नीरा शहर बाजार पेठ कोणत्याही प्रकारे बंद न ठेवण्याचा निर्णय यावेळी झाला. मात्र पुढील काळात आवश्यक गरज भासल्यास ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही मीटिंग न घेता तातडीने निर्णय घेत बाजारपेठ बंद केली तरी चालेल असे माजी सरपंच राजेश काकडे यांनी सांगितले. यामध्ये पुढील काळात आवश्यकता भासल्यास ग्रामपंचायतीने तीन दिवसासाठी बाजारपेठ बंद ठेवावी असे ठरले.

नीरेच्या आजूबाजूच्या गावांमधून कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या गावातील अनेक लोक बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी येत असतात. नीरा बाजार पेठेमध्ये किराणा व शेतमाल खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी शेजारच्या गावातील लोक येत असतात. त्यामुळे पुढील काळात नीरा शहर बंद ठेवावे अशी मागणी लोकांकडून करण्यात येत होती. आज दक्षता कमिटीची एक बैठक झाली.

यामध्ये सोशल डिस्टंन्स पाळत, लोकांनी तोंडाला मास्क लावत बाजारपेठ सुरूच ठेवण्याचे ठरले आहे. बाजारपेठ तूर्तास तरी बंद करण्याचा कोणताही निर्णय दक्षता कमिटीच्या बैठकीत झालेला नाही. मात्र शहरातील लोकांनी तसेच नीरा शहराबाहेरील लोकांनी बाजारपेठेत येत असताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. तोंडाला मास्क लावावा, कोणत्याही प्रकारे कुठल्याही दुकानात किंवा बाजारात मध्ये भाजी खरेदी करत असताना गर्दी होता कामा नये. कोणीही कट्ट्यावर गप्पा मारत बसू नये. याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे ठरले. व्यापारी सुद्धा दहा ते पाच या वेळेत दुकाने सुरू ठेवतील जर दहा पूर्वी किंवा पाच नंतर दुकान सुरू असल्यास अशा दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. असा निर्णय दक्षता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी नीरेचे सरपंच दिव्या पवार, उपसरपंच विजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, दिपक काकडे, गणपत लकडे, माजी सरपंच राजेश काकडे, मंडळ अधिकारी संदीप चव्हाण, ग्रामविकास अधिकारी मनोज ढेरे, बचत गट प्रतिनिधी सुनिता भादेकर,पोलीस हवालदार सुदर्शन होळकर, निवडक व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा