पुरंदर दि.२९ जुलै २०२० : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये झालेल्या एस. एस.एसी परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. नीरा केंद्राचा निकाल ९८.२० टक्के लागला आहे. केंद्रात लि.री.शहा कन्या शाळेची कु.कदम सानिका विनायक ९६ टक्के प्रथम, कु.फरांदे श्रावणी विवेक ९५.४० टक्के द्वितीय, कु.निगडे वैष्णवी प्रकाश ९५.२० टक्के व बा.सा.काकडे विद्यालयाची कु.अंभ्यका सुहास तावरे ९५.२० टक्के तृतीय क्रमांकाचे गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.
नीरा (ता.पुरंदर) येथील (केंद्र क्रमांक १३६६) महात्मा गांधी विद्यालयात एकुण चार विद्यालयांची समावेश होतो. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरेचा १०० टक्के, ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळूंचे विद्यालयाचा १०० टक्के, महात्मा गांधी विद्यालय नीराचा ९७.८७ टक्के, तर सौ लि .री .शहा कन्या विद्या मंदिर नीराचा ९६.६६ टक्के लागला असून, एकूण २७९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी २७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळूंचे एकूण विद्यार्थी ५८ सर्व विद्यार्थी पास झाले. निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम क्र. फरांदे तन्मय वसंत ९२.२० टक्के, द्वितीय निगडे दिग्विजय दशरथ ८८.२० टक्के, तृतीय रणनवरे अविराज रवींद्र ८६.८० टक्के मिळवून यशस्वी झाले आहेत.
मुख्याध्यापक पंढरीनाथ आढागळे यांनी अभिनंदन केले. श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे (खुर्द) एकूण विद्यार्थी ३७ सर्व पास झाले. निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम कु. अंभ्यका सुहास तावरे .९५-२० टक्के, द्वितीय कु. मानसी गजानन कुसेकर ९२-६० टक्के, तृतीय कु. मानसी भरत थोपटे ८५-६० टक्के गुण मिळविले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक कैलास नेवसे यांनी अभिनंदन केले.
महात्मा गांधी विद्यालय नीरा परीक्षेला बसलेले विद्यार्थी ९४ उत्तीर्ण ९२ विद्यार्थी पास झाले. शाळेचा निकाल ९७.८७ टक्के लागला असून प्रथम नेवसे तन्मय प्रभाकर ९४.८० टक्के, द्वितीय दगडे वेदांत यशवंत ०९.६० टक्के, तृतीय तोडकर किसन राजेश ९४.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून मुख्याध्यापक गोरख थिटे, पर्यवेक्षक जे. दाभाडे यांनी अभिनंदन केले. सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यामंदिर नीराचा निकाल ९६.६६ लागला आहे. प्रथम कदम सानिका विनायक ९६ टक्के, द्वितीय कुमारी फरांदे श्रावणी विवेक ९५.४० टक्के, तृतीय कुमारी निगडे वैष्णवी प्रकाश ९५.२० टक्के गुण मिळविले आहेत. सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
न्युज अनकट प्रतिनिधी :राहुल शिंदे.