नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भात मंगळवारी पतियाळा न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केला असून सर्व आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे. असा निकाल पतियाळा न्यायालयाने दिला आहे.
सुनावणी दरम्यान पतियाळा न्यायालयातील न्यायाधीशांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चारही दोषींसोबत संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्स सुरू असताना दोषींच्यासमोरच न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे निर्भयाच्या कुटुंबांना न्याय मिळाला आहे.
दिल्लीत २०१२ मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणामध्ये न्यायालयाने चारही दोषी अक्षय, मुकेश, विनय आणि पवन यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मंगळवारी पतियाळा न्यायालयात चारही दोषींना फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भात सुनावणी झाली.