निर्भया प्रकरण आणि त्याचा घटनाक्रम

नवी दिल्ली : सगळ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना शुक्रवारी (दि.२०)रोजी पहाटे फासावर चढवण्यात आले. पहाटे साडे ५.३० वाजता तिहार तुरुंगात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. या खटला जवळपास सात वर्षाहून अधिक काळ सुरू होता.परंतु निर्भयाच्या आईच्या लढ्याला अखेर यश आले आहे. आपण पाहणार आहोत की, या निर्भया प्रकरणाचा घटनाक्रम कसा होता.

■ १७ डिसेंबर २०१२: सहा आरोपींपैकी बसचालक राम सिंह आणि अन्य दोन जणांना अटक करण्यात आली.

■१८ डिसेंबर २०१२ : या दिवशी या प्रकरणातील चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात आली.

■ १९ डिसेंबर २०१२ : दोन आरोपींना दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यापैकी एक आरोपी विनय याने आपल्याला फाशी देण्यासाठी न्यायालयाकडे विनंती केली.

■ २१ डिसेंबर २०१२ : अल्पवयीन आरोपीला पूर्व दिल्लीतील आनंदविहार परिसरातून तर सहावा आरोपी अक्षय कुमार सिंह याला बिहारमधून अटक करण्यात आली.

■ २२ डिसेंबर २०१२ : पीडिता निर्भयाचा दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवण्यात आला.

■ २३ डिसेंबर २०१२ : निर्भया प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापना करण्यात आली.

■ २७ डिसेंबर २०१२: पीडिता निर्भयाला पुढील उपचारांसाठी सिंगापूरला नेण्यात आले.

■ २९ डिसेंबर २०१२ : गंभीर जखमी झालेल्या निर्भयानं सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात अखेराचा श्वास घेतला.

■ ३० डिसेंबर २०१२ : दिल्लीत निर्भयावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

■ ३ जानेवारी २०१३ : पोलिसांकडून सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी निर्भयाच्या आईवडिलांनी सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी केली.

■ १७ जानेवारी २०१३ : पाचही आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयाने आरोप निश्चित केले.

■ २३जानेवारी २०१३ : या प्रकरणातील एक आरोपी बाल न्यायालयाने अल्पवयीन ठरवला.

■ २फेब्रुवारी २०१३ : पाचही आरोपींवर निर्भयाच्या हत्येचे आणि इतर आरोप निश्चित करण्यात आले.

■ ३ फेब्रुवारी २०१३ : १९ मार्च रोजी लोकसभेत तर 21 मार्च रोजी राज्यसभेत कठोर कायद्यासाठी प्रासंगिक विधेयक मंजूर करण्यात आले.

■ ५ फेब्रुवारी २०१३ : या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू करण्यात आली आणि सर्व आरोपींचे जबाब नोंदवून घेण्यात आले.

■ ११ मार्च २०१३ : सहा आरोपींपैकी राम सिंह या आरोपीने तिहार तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली.

■ १४ जून: २०१३ : वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होत.

■११ जुलै २०१३ : अल्पवयीन आरोपीसंदर्भातील निकालाची तारीख निश्चित करण्यात आली होती.

■ ३१ ऑगस्ट २०१३ : अल्पवयीन आरोपीला तीन वर्षे सुधारगृहात ठेवण्याचा निकाल न्यायालयाने दिला होता.

■ १० सप्टेंबर २०१३ : मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह या चारही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले.

■ १३ सप्टेंबर २०१३ : दिल्लीच्या साकेत न्यायालयाने या प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

■ १३ मार्च २०१४ : आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.

■ ३ एप्रिल २०१६ : १९ महिन्यांनतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली.

■ ११जुलै २०१६ : गुन्हेगांरांनी सर्वोच्च न्यायलयात फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं.

■ ५ मे २०१७ : या प्रकरणी चारही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

■ १८ डिसेंबर २०१९ : निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली.

■ ७ जानेवारी २०२० : निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

■ १७ जानेवारी २०२०: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेशची दया याचिका फेटाळली.

■ २५ जानेवारी २०२० : मुकेशने याने या विरोधात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

■ ५ फेब्रुवारी २०२० : न्यायालयाने सर्व आरोपींना फाशी एकत्र फाशी देण्याचा निर्णय दिला.

■ १४ फेब्रुवारी २०२०: विनय या आरोपीनं दया याचिका फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायलयानं ती फेटाळून लावली.

■ ५ मार्च २०२० : न्यायालयाने आरोपींच्या फाशीसाठी २० मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

■ १६ मार्च २०२० : तीन आरोपींनी याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.

■ २० मार्च २०२० : सकाळी ५.३० वाजता या प्रकरणातील सर्व दोषींना फाशी देण्यात आली.

या निर्भया प्रकरणाच्या निकालामुळे गुन्हा करणाऱ्यांना निश्चितच न्याय मिळेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा