दिल्लीच्या बस नंतर मुंबईच्या कार मध्ये निर्भया

मुंबई, १२ ऑगस्ट २०२०: १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघे आरोपी ‘कंपनीची कार’ घेऊन २९ जुलै रोजी संध्याकाळी फिरायला निघाले होते. त्यांनी १५ वर्षांच्या मुलीला कारमध्ये जबरदस्ती बसवले आणि तिला घेऊन गेले. धावत्या कारमध्येच त्या तिघांनी मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला ईस्टर्न फ्री-वेवर सोडून फरार झाले.

या घटनेने भेदरलेल्या मुलीने आपल्यावर गुदरलेला प्रसंग तिच्या काकीला सांगितला. दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. फ्री-वेवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडले. या तिन्ही आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी दोघे जण इलेक्ट्रिशियन आणि चालक आहे. तर तिसरा आरोपी हा बेरोजगार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा