निर्भया प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा रद्दसाठी याचिका दाखल

24

नवी दिल्‍ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकणातील दोषी असलेल्‍या विनय कुमार याने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार (क्युरेटीव्ह) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणातील दोषींना ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

मंगळवारी, ७ जानेवारीला पटियाला हाउस कोर्टाने निर्भया सामुहिक बलात्‍कार प्रकरणातील दोषींना डेथ वॉरंट जारी केले आहे. या चार दोषींना २२ जानेवारी या दिवशी फाशी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
दिल्लीत २०१२ ला वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या निर्भयावर चालत्या बसमध्ये बलात्कार करुन तिचा निघृण खून केला होता.

या प्रकरणी तब्बल सात वर्षांनी निर्भयाला न्याय मिळणार आहे.
या प्रकरणी अक्षय ठाकूर सिंह, मुकेश, पवन गुप्ता आणि विनायक या चौघा दोषींना २२ जानेवारीला फाशी देण्याचा आदेश दिल्लीच्या पटियाला कोर्टाने दिला. या प्रकरणी सहा जण दोषी होते. पण, त्यातील रामसिंगने आत्महत्या केली, तर अन्य एक दोषी आरोपी हा अल्पवयीन असल्याने तो तीन वर्षाच्या रिमांडनंतर सुटला होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा