गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा नीरेत पुन्हा घरफोडी, ४० तोळे सोन्याचे दागिने चोरले

नीरेत पुन्हा घरफोडी, ४० तोळे सोन्याचे दागिने चोरले

नीरा.दि.२३:  ता.पुरंदर येथे साहा ठिकाणी घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. . चोरांनी अंदाजे चाळीस तोळे चोरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आज रात्री चोरांनी पोलिस चौकी पासुन हाकेच्या अंतरावर असलेली घरे फोडली.यावेळी घरामध्ये लोक झोपलेले असताना धाडसी घरफोडी करण्यात आली आहे.सध्या नीरा परिसरातील चो-यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अगदी पोलिस चौकीपासुन जवळ चोरी करून चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण करून ठेवले आहे.या घटनेचा नंतर पोलिसांनी घटना स्थळी भेट देत पहाणी केली.मात्र चोरीच्या
या वाढत्या घटनेमुळे लोकांमधे भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकांची मालमत्ता असुरक्षित

गेल्या अनेक दिवसांपासून नीरा परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत.काही दिवसांपूर्वी गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांच्या घरी चोरी करून सुमारे ४० तोळे सोन्याचे दागिने चोरले होते.निरेतील वार्ड नं २ मधील घुले काॅलनीत अनेक घरफोड्या झाल्या आहेत. परिसरातील थोपटेवाडी,पिंपरे,गुळूंचे,नीरा या गावातील शाळांतील संगणक व ईलर्नीग संच चोरीच्या घटना ताज्या आहेत. या घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. आजच्या घटनेने लोकांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यास शासन असफल असल्याचे अधोरेखीत होत आहे. वरीष्ठ पोलिस अधिका-यांनी यामध्ये लक्ष घालने आवश्यक आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version