निर्माता, दिग्दर्शक करण जोहर १४ दिवस क्वारंटाइन

मुंबई, दि.२६ मे २०२०: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतानाच पहायला मिळत आहे. त्यात राजकारणी व्यक्तींपासून सेलिब्रेटीपर्यंत हा कोरोना पोहोचला आहे. सोमवारी निर्माता दिगदर्शक करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही नोकरांचे रिपोर्ट येताच त्या दोघांनाही घराच्या बिल्डींगमधील वेगळ्या भागात ठेवण्यात आल्याची माहिती स्वत: करण जोहरने दिलीआहे.

करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, घरातील नोकरांना कोरोनाची लागण झाली असून आम्ही संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन झाल्याचे सांगितले आहे.

यासंदर्भात मुंबई महानगर पालिकेला माहिती दिल्यानंतर संपूर्ण इमारतीमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील १४ दिवसांसाठी आम्ही स्वत: अलगीकरण करुन घेतल्याचेही करणने सांगितले. तसेच, घरात काम करणाऱ्या इतर नोकरांचे आणि सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याचेही करणने सांगतिले आहे.

करण जोहरचा आज ४८व वाढदिवस असून सर्वांनी त्याला ऑनलाइन शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र , अशी घटना घडल्यामुळे अनेकांनी करणला धीर देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा