अजूनही मृत्यूशी लढत आहेत निशिकांत कामत… रितेश देशमुख यांचे ट्विट

7

मुंबई, १७ ऑगस्ट २०२०: गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेले दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे. तथापि, काही अहवाल असे सांगत आहेत की त्यांचे निधन झाले आहे. तर काही लोकांचा असा दावा आहे की त्यांची प्रकृती गंभीर आहे, पण ते अद्याप जिवंत आहेत. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांनी निशिकांत अद्याप रुग्णालयात असून जीवनाची लढाई लढत असल्याचे ट्विट करून ही माहिती दिली आहे.

गेल्या, अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यांची तब्येत सतत गंभीर आहे. निशिकांत कामत लीवर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत.

या आजारामुळे ते गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. पण आता बातमी येत आहे की त्याचे निधन झाले आहे. अभिनेता जयवंत वाडकर यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तरी त्यांच्या मृत्यूविषयी स्पष्टपणे कोणतीही बातमी हाती आलेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा