नितीन गडकरींचा रस्ता सुरक्षेसाठी मोठा निर्णय, या सर्व गाड्यांना 6-एअरबॅग्ज!

नवी दिल्ली, 15 जानेवारी 2022: रस्ते सुरक्षेत आणखी सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळं रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये प्रवाशांना अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिलीय.

प्रत्येक कारमध्ये 6 एअरबॅग असतील

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री (MoRTH) नितीन गडकरी यांनी ट्विट केलं की, त्यांनी कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्याच्या मसुद्याला मान्यता दिलीय. यामुळं कारच्या सर्व विभागांमध्ये प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित होईल. कारच्या किंमतीचा आणि व्हेरियंटचा काहीही संबंध नाही.

सर्वसामान्यांची गाडी सुरक्षित होईल

M1 श्रेणीतील कारसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितलं. M1 श्रेणीमध्ये 5 ते 8-सीटर कार समाविष्ट आहेत. अशाप्रकारे, आता सर्व मिड-रेंज कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य असतील. या नव्या निर्णयानंतर कारमध्ये दोन बाजूच्या एअर बॅग आणि दोन बाजूचे पडदेही बसवण्यात येणार असून, त्यामुळं कारमध्ये मागं बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली जाणार आहे.

सरकारने यापूर्वी ड्रायव्हरच्या सीटसाठी एअरबॅग अनिवार्य केल्या होत्या, यावर्षी 1 जानेवारी 2022 पासून ड्रायव्हरच्या तसेच सहप्रवाशाच्या सुरक्षेसाठी सर्व कारमध्ये दोन एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

महाग असू शकतात कार

सरकारच्या या निर्णयानंतर कार कंपन्यांच्या खर्चात नक्कीच वाढ होणार आहे. एअरबॅगची किंमत रु. 1800 ते रु. 2000 पर्यंत असते. अशा परिस्थितीत 6 एअरबॅग बसवण्याचा एकूण खर्च 10 ते 12 हजार रुपयांच्या दरम्यान येऊ शकतो. मात्र, एअरबॅगची मागणी वाढल्यानं त्याची किंमत कमी होईल, असा सरकारचा अंदाज आहे.

रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्या लोकांच्या बाबतीत भारत हा जगातील अव्वल देशांपैकी एक आहे. ती कमी करा, असे नितीन गडकरी वेगवेगळ्या व्यासपीठांवरून सांगत आहेत. याला जोडून सरकारची ही चाल पाहता येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा