निवडणूक आयोगाकडून नवीन मतदार ओळखपत्र लॉन्च

बंगळुरुः भारतीय निवडणूक आयोगाने नवीन मतदार ओळखपत्र लॉन्च केले आहे. इलेक्टर फोटो आयडेंटीटी कार्डचा (ईपीआयसी) रंग आणि रुपसह आधूनिक फिर्चससह हे कार्ड मतदारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ईपीआयसी कार्डवर मतदारांचा कलर फोटो असणार आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कार्डमध्ये नवीन फिचर्स असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यासाठी निवडणूक आयोगाने देशभरातील मतदार ओळखपत्रांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर कर्नाटक राज्यात हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नवीन मतदारांना २५ जानेवारीपासून या नवीन मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी दिली.
तसेच ज्यांच्याकडे जुने ओळखपत्र आहे, अशांना नुतनीकरणाच्या १५ दिवसांमध्येच नवीन मतदार ओळखपत्र प्रदान करण्यात येणार असल्याचे संजीव कुमार यांनी यावेळी नमूद केले.

प्लास्टिक मटेरिअलचा वापर करुन या नवीन मतदार ओळखपत्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. या ओळखपत्रांमध्ये निवडणूक आयोगाचे होलोग्राम, तर ओळखपत्रावर प्रत्येक मतदारांच्या फोटोसाठी बारकोड असणार आहे. भविष्यात हा बारकोड इतर ओळखपत्राशी लिंक करण्यात येणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मतदान ओळखपत्राची किंमत ३० रुपये निश्चित करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र यापेक्षीही कमी किंमत करण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे. नवीन मतदान ओळखपत्रांसाठी नवीन मतदारांकडून फॉर्म क्रमांक ६ मागवण्यात येतो. आता फॉर्म क्रमांक ६ भरल्यानंतरच अर्जदाराची डिजिटल स्वाक्षराची नोंद रजिस्ट्रेशन ऑफसरच्या ईपीआयसीमध्ये होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा