नागरिकत्व विधेयकावर शिवसेनेचे घुमजाव

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेने अचानक घुमजाव केल्याने भारतीय जनता पक्षाची चांगलीच कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे.शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, राज्यसभेत विरोधात मतदान करणार असल्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.

लोकसभेने मंजूर केलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज (बुधवारी) राज्यसभेत सादर केले जाणार आहे. अशात, शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या हृदयाचे ठोके वाढविणारा निर्णय घेतला आहे. राजकारणात काहीही कायमस्वरूपी नसते, असे ट्‌वीट सेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

राज्यसभेत सेनेचे तीन सदस्य आहेत. शिवसेनेने राज्यसभेत या विधेयकाच्या विरोधात मतदान केले तर सरकारच्या गणिताचे तीनतेरा होवू शकते. राज्यसभेत रालोआचे ११९ सदस्य आहेत तर संपुआचे १०० खासदार आहेत. लोकसभेत भाजपचे ३०३ खासदार आहेत. यामुळे सरकारला काळजी नव्हती. मात्र, राज्यसभेत सरकारचे बहुमत काठावर आहे. अशात कोणत्याही क्षणी सरकारचा खेळ बिघडू शकतो.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा