ना कोणते सैन्य आपल्या सीमेत घुसले आहे ना कोणाच्या ताब्यात आपला भाग आहे: नरेंद्र मोदी

10

नवी दिल्ली, दि. २० जून २०२०: नुकतेच गालवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यात हिंसक चकमक दिसून आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या मुद्दय़ावर सर्वपक्षीय बैठक घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की तेथे ना कोणी आपल्या सीमेवर प्रवेश केला आहे, ना आपली कोणतीही पोस्ट इतर कोणाच्या ताब्यात आहे.

सर्वपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी सर्व राजकीय पक्षांना आश्वासन दिले की आपले सैन्य सीमेचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. सर्वपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आपल्या सीमेवर कोणीही नाही किंवा आपली कोणतीही पोस्ट इतर कोणाच्या ताब्यात नाही. आपले २० बहादूर सैनिक लडाखमध्ये शहीद झाले, पण ज्यांनी भारत मते कडे वाकड्या नजरेने बघितले त्यांना धडा शिकवून ते गेले.

पीएम मोदी म्हणाले की, विकास असो, अ‍ॅक्शन असो, काउंटर अ‍ॅक्शन असो, आपल्या सैन्याने देशाच्या रक्षणासाठी जे काही करायचे आहे ते करीत आहेत. आपल्याकडे आज एवढी क्षमता आहे की कोणीही आपल्या १ इंच जमिनीकडे सुद्धा वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. आज भारताचे सैन्य वेगवेगळ्या क्षेत्रात एकत्र पणे सहभागी होण्यास सक्षम आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की गेल्या काही वर्षात आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी देशाने सीमा क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. आम्ही आमच्या सैन्याच्या इतर आवश्यकतांवरही जोर दिला आहे जसे की लढाऊ विमान, आधुनिक हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा इ. नव्याने बांधलेल्या पायाभूत सुविधांमुळे आता आमची गस्त वाढवण्याची क्षमताही वाढली आहे, विशेषत: एलएसीमध्ये.

गस्त वाढली

पंतप्रधान म्हणाले की पेट्रोलिंग वाढल्यामुळे दक्षता वाढली आहे आणि एलएसीवरील क्रियाही वेळेवर होत आहेत. पूर्वी ज्या भागात फारसे लक्ष ठेवणे शक्य नव्हते अशा भागात आता आमचे सैनिक देखरेख ठेवू शकतात आणि चांगला प्रतिसाद देऊ शकतात. आत्तापर्यंत चिनी सैनिकांना रोखले गेले नव्हते किंवा त्यांच्या कारवाई वर कोणता ही प्रतिसाद दिला जात नव्हता परंतु आता भारतीय सैन्याने त्यांना प्रत्युत्तर देत आहेत आणि जेव्हा अशा घटना होतात तेव्हा सीमेवरती तणाव निर्माण होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी