उरुळी कांचन सरपंचावर अविश्वास ठराव दाखल

उरुळी कांचन, दि. १४ जुलै २०२०: हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील सरपंच राजश्री वनारसे यांच्यावर १४ ग्रामपंचायत सदस्यांनी हवेली तहसीलदार सुनिल कोळी यांच्याकडे सोमवारी १३ जुलै रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे . दोन वर्षापूर्वी सरपंच राजश्री वनारस यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. दोन वर्षे पूर्ण होण्या अगोदरच १७ पैकी १४ सदस्यांनी सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.

१३ जुलै रोजी ग्रामपंचायत येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, अविश्वास ठरावावर उपसरपंच भाऊसाहेब कांचन, ग्रा.पं.सदस्या संतोष कांचन, सुनील बापू कांचन, समता मिलिंद जगताप, राजेंद्र जगताप, रोहित ननवरे, ज्योती पाटरकर, जितेंद्र बडेकर, सागर कांचन, अनिता बागडे, अश्विनी कांचन, रोहिणी पोपट कांचन, सारिका लोणारी, सारिका मुरकुटे हे या अविश्वासाच्या ठरारावर सह्या आहेत. विशेष सभेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचावर १४ सदस्यांनी अचानक अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे खळबळ उडाली असून, उरुळी कांचन सरपंचाने दोन वर्षांच्या काळात विकास कामे केली नसल्याची चर्चा ग्रामपंचायत सदस्य करीत आहेत. तसेच दोन वर्षापूर्वी ‘सच का साथ’ घेऊन ही विकास झाला नाही. दोन वर्षाच्या काळात गावातील विकास कामे झाली नाही. सरपंच वनारसे या ग्रामपंचायत मधील इतर सदस्यांना विश्वासात न घेता त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता एकांकी निर्णय घेतात व यांच्या बेजबाबदार कार्यभारामुळे गावच्या विकासावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

याबाबत काही त्यांना कल्पना देण्यात आली तर त्या कोणतेही प्रतिक्रिया देत नाहीत व वनारसे यांची मुले ग्रामपंचायतीच्या कार्यभारामध्ये ढवळाढवळ करत असतात याची ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये नोंद आहे. सरपंच वनारसे यांनी दोन मिटींगचे अजेंडा काढून हे स्वतः मिटींगला उपस्थित न रहाता मीटिंग संपल्यावर ग्रामपंचायत मध्ये येऊन मिटींगला ठरलेल्या विषयांमध्ये हस्तक्षेप करून बदल केल्याचे निदर्शनास आले आहे. मा. जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाचे उल्लंघन करून कोविड १९ च्या काळात गावाला वेठीस धरून नागरिकांच्या तक्रारी वरून निदर्शनास येत आहे. असे वरील ग्रामपंचायत सदस्य यांचे म्हणणे आहे. शिवाय याबाबत गावामध्ये एकच चर्चा रंगत असल्याचे चित्र आहे. व अर्जावर दोन दिवसांत निर्णय देणार तहसीलदार या संदर्भात तहसीलदार सुनील कोळी म्हणाले, “उरुळी कांचन सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाबाबतचा अर्ज आला आहे. अर्ज दाखल करुन घेतला असला तरी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९६६ च्या तरतुदी व कायद्याचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. यामुळे अविश्वास ठरावाबाबतच्या अर्जावर पुढील दोन दिवसांत निर्णय दिला जाईल.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा