अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभसंकेत, पीएम मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नऊ वर्षांत दुसऱ्यांदा अविश्वास प्रस्तावाला सामोरे जात आहे. सभागृहातील संख्याबळ पाहता हा प्रस्ताव अयशस्वी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल लोकसभेत सरकारच्या वतीने उत्तर दिले. आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावाबाबत बोलत होते.

देशातील जनतेने वारंवार आमच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी देशातील जनतेचे आभार. देव खूप दयाळू आहे. तो एका किंवा दुसऱ्या मार्गाने इच्छा पूर्ण करतो. देवाने विरोधाकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याची सूचना केली हा मी देवाचा आशीर्वाद मानतो. २०१८ मध्येही विरोधाकांनी तसा प्रस्ताव आणला तो आमच्यावरचा देवाचा आशीर्वादच होता. पण विरोधकांचा हा प्रस्ताव आमच्या सरकारची फ्लोअर टेस्ट आहे. एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभसंकेत आहेत. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा