पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अद्याप गुन्ह्याची नोंद नाही

पुणे, १४ फेब्रुवरी २०२१: पुण्यातील तुझ्या चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात गदारोळ होताना दिसत आहे. एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात आल्यामुळे विरोधी पक्षांकडून देखील याप्रकरणी कारवाई करण्याबाबत सरकारकडे मागणी करण्यात येत आहे. आपल्या राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत या तरुणीने आत्महत्या केली होती. या प्रकरणाला आज सात दिवस पूर्ण होत आहे.

याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. हे प्रकरण पूर्ण मार्गे लागेपर्यंत आम्ही तपास करणार असे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच कायदेशीर अडचणींमुळे गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील दोन्ही तरुणांचे जबाब नोंदवण्यात आल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून याबाबत देखील माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली. पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे.

पूजाने रविवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजता आत्महत्या केली. पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून तिने उडी मारून आत्महत्या केली. पूजा पुण्यात राहत असलेल्या हेवनपार्क सोसायटी ही तीन मजली आहे. यातील तिसऱ्या मजल्याला पायऱ्या नसल्याने या मजल्यावर कोणालाही जाता येत नाही. या संपूर्ण इमारतीत केवळ पाच कुटुंब राहतात. पूजा पहिल्या मजल्यावर राहत होती. पहिला मजला आणि रोडचं अंतर ३० ते ३२ फूट असल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा