दुबई ,७ ऑक्टोबर,२०२० :आयपीएल २०२० सुरू झाल्यापासून सर्वत्र क्रिकेट चे वातावरण पसरले आहे. रोज नव नवीन विक्रम मोडले जात आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याने नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे. जो विक्रम अजूनपर्यंत कोणताही भारतीय क्रिकेटपटू नाही करू शकला आहे.
दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात भलेही रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला पराजयाचा सामना करावा लागला असेल परंतु रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याने टी -२० मध्ये एक अनोखा विक्रम केला आहे. विराट कोहली याने आपल्या टी -२० कारकिर्दीत ९००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा विक्रम याआधी कोणत्याही भारतीय फलंदाजाला करण्यात यश मिळाले नाही आहे.
सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या १० धावा केल्या असता विराट कोहली याने टी २० कारकिर्दीत ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. या विक्रमासोबत विराट कोहली ९००० धावांच्या क्लब मध्ये सहभागी झाला आहे.कोहली आधी आणखीन ६ फलंदाजांना ९००० धावांचा टप्पा पार करण्यात यश मिळाले आहे. यात क्रिस गेल, कायरोन पोलार्ड, शोयाब मलिक ,डेव्हिड वॉर्नर, आरोण फिंच आणि ब्रेंडन मेक्कुलम यांचा समावेश आहे.
विराट कोहली याच्या नावे आता टी २० क्रिकेट मध्ये एकूण ९०३३ धावा आहेत. तसेच टी २० क्रिकेट मध्ये १०००० चा टप्पा फक्त कॅरेबियन फलंदाज क्रिस गेल आणि कायरोन पोलार्ड यांनी पार केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे