मालेगाव मध्ये तूर्तास लष्कराची आवश्यकता नाही : पालकमंत्री भुजबळ

नाशिक, दि.७ मे २०२०: मालेगावमध्ये वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथल्या जनतेने सहकार्य करणे अपेक्षित आहे. तिथल्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे मालेगाव मध्ये तूर्तास लष्कराला पाचारण करण्याची आवश्यकता नसल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

मालेगाव आणि नाशिक येथील कोरोनाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी सुरज मांढरे, विभागीय आयुक्त राजाराम माने, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले की, सध्या शहरातील लोकडाऊन काही प्रमाणात शिथिल केला असून तो वाढवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याची स्पष्टोक्ती छगन भुजबळ यांनी केली. मालेगाव इथे पोलीस बंदोबस्तासाठी सुरक्षित अंतराचे पालन करणे जमत नसल्याने पोलिसांनाच कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे जिथं पोलीस कमी पडतील तिथं होमगार्ड यांची नेमणूकीची तरतूद केली जाणार आहे. तसेच त्यांच्या मानधनाबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी भुजबळ यांनी सांगितले

नाशिकमध्ये कोरोना अहवाल तपासणी केंद्र होऊन सुद्धा अहवाल येण्यास उशीर होत आहे. दिवसेंदिवस संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नाशिकच्या डॉ वसंत पवार मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केंद्रवर अतिरिक्त ताण येत आहे. परिणामी कोरोनाच्या आकड्यांच्या गोंधळ वाढल्याने मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमधून नाशिकचे दिवसाला ३०० अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा