२०२२ च्या आधी कोरोना पासून मिळणार नाही मुक्ती, ‘डब्ल्यूएचओ’ चा दावा

12

जिनेवा, १७ सप्टेंबर २०२०: जग कोरोना विषाणूच्या प्रभावी लसीची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या प्रमुख वैज्ञानिक सौम्य स्वामीनाथन यांनी दिलेल्या निवेदनामुळं लोकांच्या अपेक्षांना धक्का बसलाय. त्यांनी मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सामान्य जीवन पूर्ववत होण्यासाठी २०२२ पर्यंत तरी पर्याप्त लस उपलब्ध होणार नाही.

स्वामीनाथन म्हणाल्या, “डब्ल्यूएचओ’च्या कोव्हॅक्स उपक्रमांतर्गत उत्पन्नाच्या तुलनेत वेगवेगळ्या देशांमध्ये योग्यरीत्या लसीचं वितरण केलं जाईल” यासाठी पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत कोट्यावधी लस डोस तयार करावे लागतील. म्हणजे याचा अर्थ असा की या अंतर्गत याच्याशी संबंधित १७० देशांना किंवा अर्थव्यवस्थांना याचा काहीना काही फायदा होईल.”

तथापि जोपर्यंत या लसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही तोपर्यंत मास्क व सोशल डिस्टंसिंग चा विचार करता काही प्रमाणात लस उपलब्ध करणं गरजेचं आहे. २०२१ च्या अखेरीस या लसीचे दोन अब्ज डोस तयार होणं हे आमचं लक्ष आहे.

ते म्हणाले की, लोकांना असं वाटत आहे की पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यापर्यंत सर्वांना लस मिळल व जनजीवन पुन्हा पूर्ववत होईल. खरं तर असं होत नाही. २०२१ च्या सुरुवातीस आपण ही लस वितरण करण्यास सुरुवात करणार आहोत. याचं कारण असं की, २०२१ पर्यंत केवळ यावर परीक्षण सुरू राहणार आहे. २०२१च्या सुरुवातीपर्यंत या लसीचं पूर्ण परिक्षण झालेलं असेल. याचे अंतिम परिणाम देखील समोर आले असतील. यानंतरच ही लस वितरणासाठी तयार असेल.

तथापि, चीन याबाबतीत मोठ्या आक्रमकतेनं पुढं गेलाय. चाइनीज सेंटर फॉर डिसीज अँड प्रीवेंशन’ च्या वू गिजिन यांनी मंगळवारी सांगितले की, “नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत चीनला स्थानिक पातळीवर लस विकसित करण्यास परवानगी मिळू शकल”. दुसरीकडं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चार आठवड्यांत ही लस देण्याचा दावा केलाय.

स्वामीनाथन म्हणाल्या, ‘ज्या लीसिंच्या सध्या चाचणी सुरू आहे त्यांना कमीत कमी बारा महिने तरी लागणार आहेत. हा तो काळ आहे ज्यात सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये लसीचे कोणतेही दुष्परिणाम दिसून येणार नाहीत. हा एक साथीचा रोग असल्यानं अनेक नियामक आपत्कालीन वापराची यादी बनवू इच्छित आहेत. परंतु, यासाठी देखील निकष निश्चित करणं आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे