गोल पोस्ट इतर नोबेल हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या १३ जणांची सुटका

नोबेल हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या १३ जणांची सुटका

पुणे: हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल अनेक्सच्या इमारतीमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या १३ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ही घटना आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडली.
हडपसर अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल अनेक्सच्या इमारतीमधील लिफ्टमध्ये १३ कर्मचारी अडकल्याची माहिती अग्निशामकच्या कर्मचाऱ्यांना आज सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी मिळाली. घटनेची माहिती मिळताच हडपसर अग्निशमन केंद्रातून एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंधरा ते वीस मिनिटाच्या प्रयत्नानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या १३ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
यावेळी अग्निशामक दलाचा एक बंब व लिफ्ट कंपनीचे कर्मचारी देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version