Nokia 110 लॉन्च, मिळेल कॅमेरा आणि कॉल रेकॉर्डिंग, ही आहे किंमत

पुणे, ५ ऑगस्ट २०२२: एकेकाळी मोबाइल फोनच्या बाजारपेठेवर अधिराज्य गाजवणाऱ्या नोकियाला स्मार्टफोनच्या बाजारपेठेत वर्चस्व गाजवता आले नाही. तथापि, कंपनीने फीचर फोन सेगमेंटमध्ये स्वतःला खूप मजबूत बनवले आहे. यामुळेच बहुतांश कंपन्या स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित करतात. नोकिया अजूनही फीचर फोनवर काम करत आहे.

अलीकडेच, कंपनीने भारतात दोन फीचर फोन लॉन्च केले आहेत. Nokia 8210 4G सोबत, ब्रँडने Nokia 110 (२०२२) लाँच केलाय. Nokia 8210 मध्ये ड्युअल सिम कार्ड, VoLTE सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Nokia 110ने सिम्पल डिझाइन आणि बेसिक फीचर्सचं सत्र सुरू ठेवलं आहे. चला Nokia 110 (२०२२) ची किंमत आणि इतर खास गोष्टी जाणून घेऊया.

Nokia 110 (२०२२) ची किंमत किती आहे?

नोकियाचा हा फोन तीन रंगात उपलब्ध आहे. तुम्ही तो चारकोल, Cyan आणि रोज गोल्डमध्ये खरेदी करू शकता. त्याचे दोन व्हेरियंट Cyan आणि Charcoal ची किंमत १६९९ रुपये आहे.

त्याच वेळी, रोझ गोल्ड व्हेरियंट 1799 रुपयांना येतो. यासोबत २९९ रुपये किमतीचे इअरफोन मोफत मिळतील. हा हँडसेट तुम्ही रिटेल आउटलेट्स, ई-कॉमर्स साइट्स आणि नोकियाच्या अधिकृत साइटवरून खरेदी करू शकता.

त्यात विशेष काय?

तुम्हाला Nokia 110 (२०२२) मध्ये आकर्षक डिझाइन मिळेल. यामध्ये नोकियाचं सिग्नेचर डिझाईन दिसेल. हँडसेट रियर कॅमेरा, म्युझिक प्लेयर आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंग सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. फोनमध्ये मोठे स्टोरेजही उपलब्ध असेल (या फोननुसार स्टोरेज मोठं असेल). कंपनीचं म्हणणं आहे की यामध्ये तुम्हाला नोकियाची बिल्ड क्वालिटी मिळंल.

डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी १०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. तुम्ही ३२GB पर्यंत स्टोरेज वाढवू शकता. कंपनीच्या मते, तुम्ही बॅटरीची चिंता न करता हा फोन वापरू शकता.

त्यावर तुम्ही एफएमही ऐकू शकता. दैनंदिन गरजांचीही काळजी घेण्यात आली आहे. डिव्हाइस इनबिल्ड फ्लॅशलाइट, स्टोरेज क्षमता आणि प्री-लोडेड गेम्ससह येतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा