नोकियाचा अफोर्डेबल फोन G10 भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये

पुणे, 15 सप्टेंबर 2021: Nokia G10 आता भारतात लॉन्च करण्यात आला आहे. Nokia G10 हा बजेट स्मार्टफोन आहे. हा HD+ डिस्प्लेसह येतो. पॉवर बॅकअप साठी यात 5050mAh ची बॅटरी आहे. हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कंपनीने दावा केला आहे की ती या फोनला दोन वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट देईल. यामध्ये तीन वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट दिली जातील.

नोकिया G10 किंमत आणि उपलब्धता

Nokia G10 ची किंमत 12,149 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा फोन नाईट आणि डस्क कलरच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन Nokia.com वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनसह कंपनीने जिओ एक्सक्लुझिव्ह ऑफर देखील जाहीर केली आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 10 टक्के इन्स्टंट सपोर्ट मिळतो. यासाठी त्यांना MyJio द्वारे या ऑफरसाठी नावनोंदणी करावी लागेल.

Nokia G10 चे वैशिष्ट्य

Nokia G10 ऑक्टा कोर MediaTek Helio G25 प्रोसेसर 4 जीबी रॅमसह देण्यात आला आहे. यात 64GB ची इंटरनल मेमरी आहे. मायक्रो-एसडीच्या मदतीने ते 512GB पर्यंत वाढवता येते. यात 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच HD+ डिस्प्ले आहे.

हा ड्युअल सिम स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या बजेट स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 13-मेगापिक्सेलचा आहे. मेन कॅमेरासह एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.

यात 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी त्याच्या फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यात 1050 फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5050mAh ची बॅटरी आहे. यात साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच एक डेडिकेटेड Google assistant बटण आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा