उत्तर कोरियाने पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले; अमेरिका-दक्षिण कोरियासोबत तणाव वाढला

पुणे, १६ मार्च २०२३ : उत्तर कोरियाचा दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसोबतचा तणाव वाढत आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी सरावाला उत्तर म्हणून उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करून सर्वांना आव्हान दिले आहे. रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियाने सांगितले की, उत्तर कोरियाने तिसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. उत्तर कोरियाच्या म्हणण्यानुसार, हे लांबपल्ल्याचे क्षेपणास्त्र प्योंगयांगच्या सुनान भागातून सोडण्यात आले. चार दिवसांपूर्वी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने पाणबुडीवरून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती.

दक्षिण कोरियाच्या सैन्याने तीव्र प्रादेशिक तणावाच्या दरम्यान क्षेपणास्त्र जाताना पाहिले. जॉइंट चीफ ऑफ स्टाफने सांगितले की, क्षेपणास्त्र चाचणी कोरियन द्वीपकल्पाच्या पूर्व किनार्‍यापासून पाण्यात सोडण्यात आली आहे.

उत्तर कोरियासमोरील आव्हान पाहता वॉशिंग्टन आणि सोलने अनेकदा संयुक्त लष्करी सराव केला होता. त्याचवेळी, लष्करी सरावांमध्ये अमेरिका, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये तणाव वाढत आहे. हे पाहता उत्तर कोरिया अनेकदा कोणत्या ना कोणत्या चाचण्या करीत असतो.

खरं तर, उत्तर कोरियाची ही क्षेपणास्त्र चाचणी दक्षिण कोरिया आणि जपानच्या नेत्यांची टोकियोमध्ये भेट होण्याच्या काही तास आधी झाली होती. प्योंगयांगचे क्षेपणास्त्र आणि आण्विक कार्यक्रम त्यांच्या अजेंड्यात समाविष्ट होते. त्याच वेळी, उत्तर कोरियाचे म्हणणे आहे की, अशा प्रकारचे लष्करी सराव हे आक्रमणाची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहेत. फ्रीडम शील्ड म्हणून ओळखला जाणारा अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील हा लष्करी सराव सोमवारपासून सुरू झाला असून पुढील १० दिवस चालणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा