उत्तर कोरिया, १३ ऑक्टोंबर २०२०: उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांनी पहिल्यांदा अपयशी ठरल्याबद्दल जनतेची दिलगिरी व्यक्त केली. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार किम जोंगनं कोरोना साथीच्या कठीण परिस्थितीत अपयशी ठरल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. माफी मागितल्यावर किम जोंग त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसताना देखील निदर्शनास आले.
आपल्या पक्षाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त भाषण करताना किम जोंग उन भावनाप्रधान झाले. किम जोंग उन म्हणाले की, उत्तर कोरियाच्या लोकांच्या अपेक्षेनुसार आपण प्रयत्न करू शकलो नाही आणि त्यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. अहवालानुसार किम जोंग’नं भाषणादरम्यान चष्मा काढून आपले अश्रू पुसले.
आपल्या पूर्वजांचा आणि वारशाचा उल्लेख करताना किम म्हणाले, “किम 2 संग आणि किम जोग इल यांचा महान उद्देश पूर्ण करण्याची जबाबदारी या देशातील लोकांनी मला दिली आहे.” परंतु माझे प्रयत्न आणि गांभीर्य लोकांच्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी पुरेसे सिद्ध झाले नाही. मला याची खंत आहे.
असं म्हटलं जात आहे की, किम जोंग उन’च्या अशा प्रकारे अचानक भावूक होणं असं दर्शवितं की, कोरोना विषाणूच्या साथीचा रोग आणि अण्वस्त्रांवर निर्बंध यामुळं त्याच्या नेतृत्त्वावर बराच मोठा दबाव आला आहे.
किम जोंग उन यांनी आपल्या भावनिक भाषणादरम्यान कोरोना विषाणूच्या साथीमुळं संपूर्ण जगात होत असलेल्या आव्हानात्मक काळांचा उल्लेख केला. किम जोंग यांनी दक्षिण कोरियाशी संबंधही सुधारण्याची इच्छा व्यक्त केली. तथापि, किम जोंग यांनी थेट अमेरिकेवर टीका केली नाही.
शनिवारी लष्करी परेडमध्ये उत्तर कोरियानं नवीनतम क्षेपणास्त्र प्रदर्शित केले. हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाच्या इंटर-कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापेक्षाही अधिक प्रभावी आहे. दक्षिण कोरियानं लष्कराच्या पारड्यावर चिंता व्यक्त केली आणि उत्तर कोरियाला नि: शस्त्रीकरण करण्याच्या आश्वासनाचं पालन करण्याचं आवाहन केलं. दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री म्हणाले, उत्तर कोरियानं जे क्षेपणास्त्राचं प्रदर्शन यावेळी केलं ते लांब पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र दाखविले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे