उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्रांचा मारा

उत्तर कोरिया, ३ नोव्हेंबर, २०२२ : उत्तर कोरियाने नुकतेच जपानवर मिसाईलचे (क्षेपणास्त्र) बंबार्डिंग केले आहे, असे म्हंटल्यास आता वावगं ठरणार नाही. सध्या कोरियाने दोन मिसाईल सोडले असून त्यांनी मिसाईलची टेस्ट करण्यासाठी मिसाईल सोडणयात आल्याचं कोरियाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र अजून किती मिसाईल येतील, हे सांगणे, मात्र कठीण आहे, असं जपानचे म्हणणे आहे.

सध्या हे मिसाईल जपानच्या पूर्वेकडील भागात पाण्याच्या ठिकाणी पडल्याचे दिसून आले आहे. जपानकडून तेथील रहिवाश्यांना भूभागात किंवा जमिनीखालील बोगद्यात जाण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणत्याही प्रकारची जिवितहानी यात झाली नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

हे मिसाईल उत्तर कोरियाने अतिशय महाग किंमतीत खरेदी केले आहेत. त्यांच्याकडून अजून डझन मिसाईलची चाचणी होण्याची शक्यता आहे. यातल्या पहिल्या क्षेपणास्त्राचे अर्थात मिसाईलचे टेस्टिंग २०१७ ला झाले होते. या टेस्टिंगमुळे रशिया आणि युक्रेन युद्धात अडथळा आणण्याचा आणि युद्ध थांबवण्याचा उत्तर कोरियाचा मानस आहे.

हे मिसाईल उत्तर कोरियाच्या गुनाम येथून सोडण्यात आले असून पॅसिफिक मधली अमेरिकन मिल्ट्रीला धोका पोहचवू शकते, असेही सूत्रांनी सांगितले आहे.
त्यामुळे जपानवर अजून किती क्षेपणास्त्रांचा मारा होईल, हे सांगता येणे कठीण आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा