ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते मोर्बा गणात विविध विकासकामांचे भूमिपूजन

रायगड १७ डिसेंबर २०२३ : मोर्बा पंचायत समिती गणात, १६ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ना.आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्राम विकास सडक योजने अंतर्गत, निळगुण-बामणोली-राजीवली रस्ता (रक्कम १ कोटी ४४ लाख), उणेगाव- चापडी रस्ता (रक्कम १ कोटी ७७ लाख), ढालघर फाटा ते लोणशी मोहल्ला-वावे हरिजनवाडी रस्ता (रक्कम १ कोटी ८० लाख) व आमदार निधीतून चापडी येथे सामाजिक सभागृह (रक्कम ७ लाख), रिळे येथे सामाजिक सभागृह (रक्कम ७ लाख) या कामांचे भूमिपूजन पार पडले.

यावेळी ना. आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, नुकत्याच पार पडलेल्या लोणशी, उणेगाव, मोर्बा ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवीत सरपंच व सदस्यांना विजयी केले. खा. तटकरे यांनी नेहमी या विभागाला झुकते माप दिल्यामुळे अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. पूढे ही अशीच विकासकामे करण्यात येतील. तटकरे कुटुंब नेहमीच तुमच्या सोबत आहे. मागील काळात रखडलेली विकासकामे लवकरच मार्गी लावण्यात येतील. यावेळी नवनियुक्त ग्राम पंचायत सरपंच, सदस्य व युवक जिल्हाध्यक्ष शादाब गैबी यांचा ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, महिला अध्यक्षा संगीता बक्कम, अल्पसंख्याक अध्यक्ष अल्ताफ धनसे, सोशल मीडिया प्रमुख किशोरी हिरवे, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, उपाध्यक्ष शादाब गैबी, मोर्बा सरपंच शौकत रोहेकर, उपसरपंच राजू मोरे, उणेगाव सरपंच शुभांगी शिर्के, लोणशी सरपंच सिद्धेश पालकर, होडगाव सरपंच बळीराम खाडे, देगाव सरपंच सुषमा वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, इकबाल हर्णेकर, चिंचवली सरपंच नंदू पारावे, उद्योजक विजय मेथा, विनोद वाघमारे, राहुल दसवते, ग्राम पंचायत देगाव, उणेगाव, लोणशी व मोर्बा विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रमोद जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा