८नोव्हेंबर २०१६ हा दिवस सर्व सामान्यांसाठी धडकी भरवणारा असाच दिवस होता. आज बरोबर तीन वर्षांपूर्वी नोटांबंदीची घोषणा झाली होती. या दिवशी रात्री ८वाजता अचानक झालेल्या नोटाबंदीमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय ज्याची आजपर्यंत सर्वसामान्यांना झळ सहन करावी लागत आहे.
५००आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यामुळे सर्वसामान्यांकडे असणारा पैसा नुसता कागदच उरला. त्यामुळे सर्वसामान्यांना अनंत यातना सहन कराव्या लागल्या होत्या. या नोटा बंदीचे अनेक फायदे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र नियोजनाच्या अभावामुळे नोटांबंदीने अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग धंदे बंद पडले. त्यामुळे जुन्या नोटांकडे बघत राहण्याशिवाय सर्वसामान्यांकडे दुसरा काही पर्यायच नव्हता.
नोटा बदलण्यासाठी तर भर उन्हात दिवस दिवस रांगेत उभे रहावे लागत असे. त्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमवले. पण याचा सरकारवर काहीच परिणाम झाला नाही. उलट नोटा बदलीसाठी म्हणजे हक्काच्या पैशांसाठी बँकेत तासनतास उभे राहावे लागत असे. त्यामुळे सर्वसामान्य उध्वस्त झाल्याचे चित्र संपर्ण भारतात पहायला मिळाले.
एक विचार केला तर नोटाबंदीमुळे फायदा झाला तो सरकारचा. बाकी कुणालाही याचा फायदा झाल्याचे पहायला मिळाले नाही. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे. त्यांच्याकडून पैसा काढण्याच्या नादात याचा सर्वसामान्यांना किती मोठा तोटा सहन करावा लागला याची जाणीव सरकारला झालीच नसावी. म्हणून नोटांबनदीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी पैसे अक्षरशः रस्त्यावर पोतेच्या पोते फेकून दिल्याचे पहायला मिळाले. नोटाबंदी ही सर्वसामान्यांसाठी एक आयुष्य बंद करणारी होती. यामुळे काहींनी आपले आयुष्य संपवून घेतले. या नोटांबनदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली. पण तरीही सरकारवर याचा काही परिणाम झाला नाही. यामुळे लोकांकडे पैसे राहिले नाहीत. काही तर दोन वेळच्या अन्नासाठी महाग झाले.
मोदी सरकारने घेतलेल्या नोटा बंदीच्या निर्णयाला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत.परंतु याची झळ अजूनही सर्वसामान्यांना सहन करावी लागत आहे. आजचा दिवस हा भारतीयांसाठी धडकी भरवणाराच आहे. याच दिवशी रात्री सर्वसामान्य उध्वस्त झाल्याचे चित्र होते. त्यामुळे हा दिवस सर्वानाच एक वाईट दिवस म्हणून लक्षात राहील, हे काही सांगायला नको.
-प्रशांत श्रीमंदिलकर