नोट बंदी नंतर सोन्यावर मर्यादा

44

दिल्ली: नोटबंदी नंतर काळा पैशावर रोक लावण्यासाठी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेत आहे. लोकांनी आपल्याकडे असलेल्या सोन्याचा तपशील वेळेच्या आधी सरकारला देणे बंधनकारक आहे. जर कोणाकडे विना पावतीचे सोने आढळून आल्यास त्यावर सरकार कारवाई करण्यात येणार आहे.

लोकांना आपल्याकडे ठेवलेल्या सोन्याची किंमत व्हॅल्युएशन सेंटर कडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असणार आहे. सध्या सरकार या गोष्टींवर विचार करत असल्याचे कळले आहे.
या नवीन प्रस्तावानुसार लोकांकडे अन अकाउंटेड सने म्हणजेच लोकांकडे जे सोने आहे त्याची त्यांच्याकडे पावती नसेल किंवा ते कुठून आणले हे सांगण्यास ते असमर्थ नसतील तर अशा सोन्याची किंमत नागरिकांना सरकारने ठीक ठिकाणी उघडून दिलेल्या व्हॅल्युएशन सेंटरमधून ठरवून घेणे आवश्यक असणार आहे. या सोन्यासाठी एलिवेशन सेंटर कडून प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाण पत्रानुसार नागरिकांना त्या सोन्याचा कर भरावा लागणार आहे. अशाप्रकारे जवळ असलेले सोने वैध स्वरूपात येईल.
तुमच्याकडे थोड्या प्रमाणात सोने असेल तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. सरकार किती प्रमाणात सोने असावे यासाठी काही नियम बनवणार आहे. ही सवलत सरकार काही मर्यादित वेळेपुरती ठेवणार आहे त्यानंतर जर असे अवैद्य सोना आढळून आल्यास त्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात येईल. हा प्रस्ताव ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मंजूर होणार होता परंतु हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असल्यामुळे प्रस्ताव लांबणीवर पडला. असे सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर हा ठराव मंजूर होणार आहे.