प्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांना यंदाचा अरुण दाते कला सन्मान पुरस्कार जाहीर

पुणे, ३० एप्रिल २०२३ : लोकप्रिय भावगीत गायक स्व. अरुण दाते यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा अरुण दाते कला सन्मान पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार रामुभैय्या दाते स्मृती समिती व अतुल अष्टेकर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येईल अशी माहिती स्व. अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते यांनी दिली.

स्व. अरुण दाते यांच्या ९० व्या जयंतीचे औचित्य साधत रवींद्र साठे यांना हा पुरस्कार राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणाऱ्या ‘शुक्रतारा’ या कार्यक्रमादरम्यान प्रदान करण्यात येईल. रवींद्र साठे एक प्रसिद्ध गायक असून दूरदर्शनवरील त्याच्या विविध सांगीतिक कार्यक्रमांमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. स्व. विजय तेंडूलकर लिखित व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित घाशीराम कोतवाल या अत्यंत गाजलेल्या नाटकाचे रवींद्र साठे हे मूळ कलाकार आणि क्रू सदस्य होते.

अरुण दाते कला सन्मान पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी संगीतकार अशोक पत्की, कवी प्रवीण दवणे यांना तर दुसऱ्या वर्षी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि अनुराधा मराठे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा