नौदल दिन विशेष

भारतीय नौदल अभिमानस्पद….

भारतीय नौदल इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. इ.स. 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजय मिळविणे सोपे झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ : छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हंटले जाते.

आपल्या देशाचे नौदल हे जगातील सातव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या ताफा तर २०० मरीन कमांडों आहेत. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.
भारतीय नौदलाकडे एकूण ८७ युद्धनौका आणि ६० हजारांहून अधिक सैनिक आहेत.

भारतीय नौदलाची ताकद :
● एअरक्राफ्ट नेणारे जहाज – १
● दुहेरी वाहनसेवा करणारे जहाज – १
● लँडींग जहाज टँक – ८
● विनाशकारी जहाजे – ११
● फ्रिगेट (छोटी जहाजे) – १३
● कॉर्वेटेज – २४
● माईन विनाशकारी जहाजे – ४
● किनार्‍यावरील पेट्रोल जहाजे – १०
● फ्लीट टँकर – ४
● सर्व्हे जहाजे – ७
● संशोधन जहाज – १
● प्रशिक्षण जहाजे – ३

नौदलाचे युद्धकालीन कार्य

● आपल्या राष्ट्रीय व सागरी सीमांचे संरक्षण करणे
● बंदरे व समुद्रकिनारा यांचे रक्षण करणे
● सागरी व्यापाराला संरक्षण देणे
● शत्रूची सागरी नाकेबंदी करणे
●सागरांतर्गत तेल व इतर खनिज संपत्ती यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे

●जल-स्थलीय कारवायांना योग्य प्रतिसाद देणे

●आपल्या उपस्थितीने आर्थिक व राजकीय फायदे मिळविणे

●अनुकूल प्रसंगी लढाया करून शत्रूचे नाविक बळ खच्ची करणे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा