पणजी: भारतीय नौदलातील जवळ जवळ सर्वच विमाने खूप जुनी झाली आहेत. यातील बरीचशी विमाने कालबाह्य करण्याच्या तयारीत नौदल आहे. परंतु विमानांच्या संख्येत मोठी घसरण होईल यामुळे या जुन्याच विमानांना अपग्रेड करून नौदल वापरत आहे. खरेतर भारत सरकारने याआधीच विमानांचा या समस्येवर लक्ष दिले पाहिजे होते पण उशिरा का होईना भारत सरकारने विमानांची आयात करण्यास सुरुवात केली आहे.
प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे नौदलाचे एक मिग-२९ के हे विमान गोव्यात आज कोसळले मात्र वेळीच प्रसंगावधान दाखवून बाहेर पडल्यामुळे दोन्ही वैमानिकांच्या जीव वाचला. ही माहिती रियर ॲडमिरल फिलीपो जॉर्ज प्यानुमुट्टी यांनी दिली. नेहमीच्या सराव उद्यानावर निघालेले हे विमान वेरणा या गावाजवळ कोसळले. मात्र प्रसंगावधान दाखवून यांनी हे विमान गावापासून लांब नेल्याने मोठी दुर्घटना टळली. नौदलाच्या हंसा या तळावरील हे विमान होते कॅप्टन एस शिवकंद आणि लेफ्टनंट कमांडर दीपक यादव हे वैमानिक या दुर्घटनेतून बचावले.