आता ड्रॅगन पाकिस्तानला अंतराळ मोहिमेतही करणार मदत, बनवणार स्पेस स्टेशन आणि पाठवणार उपग्रह

नवी दिल्ली, 30 जानेवारी 2022: पाकिस्तानला व्यापारापासून ते शस्त्रास्त्रांपर्यंत मदत करणारा चीन आता त्याच्यासोबत अंतराळ मोहीम वाढवणार आहे. इस्लामाबादच्या सहकार्याने ते अंतराळ कार्यक्रम पुढं नेणार असल्याचं चीनच्या वतीनं सांगण्यात आलंय. पाकिस्तानसाठी स्पेस स्टेशन बांधण्यापासून ते अधिकाधिक उपग्रह सोडणार असल्याची घोषणा चीनने शुक्रवारी केली.

काय आहे चीनचा अंतराळ कार्यक्रम 2021

चीनच्या अंतराळ कार्यक्रम 2021 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेत पाकिस्तानचा अनेकदा उल्लेख करण्यात आलाय. त्यात म्हटलं आहे की, चीन पाकिस्तानसाठी दळणवळण उपग्रह विकसित करणं आणि स्पेस स्टेशन बांधणीत सहकार्याला प्राधान्य देईल. याशिवाय येत्या पाच वर्षांत ते जागेवरील काम आणखी वाढवणार आहेत. चीन आधीच स्वतःचं स्पेस स्टेशन बनवत आहे, जे या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. चीनने चंद्र आणि मंगळावरील आपली मोहीम यशस्वीपणे पूर्ण केलीय.

2018 मध्ये पाठवले दोन उपग्रह

2018 मध्ये चीनने पाकिस्तानला त्यांच्या अंतराळ मोहिमेत मदत केली आहे. पाकिस्तानचे पहिले ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग उपग्रह PRSS-1 आणि PakTES-1A प्रक्षेपित करण्यासाठी चीनकडून मदत मिळाली होती.

प्रक्षेपणात केली अनेक देशांना मदत

पाकिस्तानपूर्वी चीनने अनेक देशांना उपग्रह प्रक्षेपणात मदत केलीय. चीनची उपग्रह वाहून नेण्याची किंवा प्रक्षेपित करण्याची सेवा आतापर्यंत सौदी अरेबिया, पाकिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, कॅनडा या देशांना देण्यात आलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा