आता नोकरदारांना ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टीचा पर्याय

नवी दिल्ली, १० फेब्रुवरी २०२१: देशात नवीन लेबर कायदा म्हणजेच कामगार कायदा लागू होणार आहे. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या नुसार आता नोकरदारांना ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ही बाब आनंदाची असली तरी यात आणखी एक तरतूद करण्यात आली आहे. यानुसार हा कामगार कायदा लागू झाल्यानंतर आपल्याला ८ तासांच्या ऐवजी १२ तास काम करावे लागण्याची शक्यता आहे.

या नवीन कायद्यासाठी बहुतांश राज्यांनी आपली नियमावली तयार केली आहे. ४ दिवस काम करून ३ दिवसांची सुट्टी घेणे असे करणे सक्तीचे नसेल. या पर्यायावर कंपनी आणि कर्मचारी दोघे मिळून निर्णय घेऊ शकतात. केंद्रीय कामगार सचिव अपूर्व चंद्र म्हणाले की, केंद्रीय कामगार मंत्रालय नव्या मसुद्यावर काम करत आहे. कामाची बदलणारी पद्धत पाहून कामांच्या वेळांमध्ये काही सुधारणा करण्याचे प्रयत्न आहेत. काही सवलती देण्याचा प्रयत्न आहे. याबाबतच्या शंका चर्चेतून सोडविण्यात आल्यात, असे अपूर्व चंद्र यांनी स्पष्ट केले.

१ एप्रिल पासून होणार लागू

याबाबत सरकार ४ नवीन कामगार कायदे तयार केले जात असुन लवकरच ते लागू केले जातील याबाबत माहिती देताना केंद्रीय कामगार सचिव अपूर्व चंद्र म्हणाले की, येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा झालीय. लवकरच हे कामगार मंत्रालय चार नवीन कायदे लागू करण्याच्या स्थितीत असेल. यामध्ये पगार/वेतन कोड, औद्योगिक संबंधांचे कोड, कामाशी संबंधित सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी अटी (ओएसएच) आणि सामाजिक सुरक्षा असा कायद्यांचा समावेश असेल. कामगार मंत्रालय एप्रिलपासून चार कायद्यांची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा