कोलकाता,१७ ऑक्टोबर २०२२: बंगालच्या उपसागरात आयएनएस अरिहंत पाणबुडीतून भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी ट्रिगर दाबताच के-१५ एसएलबीएम क्षेपणास्त्र सुसाट सुटले, या क्षेपणास्त्राने तासी ७५० कि.मी. अंतरावरील लक्ष्याचा आचुक मारा केला.
यामुळे आता भारतही पाण्याखालूनही अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम देश बनला आहे. या यशस्वी चाचणीसह भारत आता अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन व्यतिरिक्त जगातील सहावा ‘न्युक्लिअर ट्राएट’ देश बनला आहे. या आधीही भारताने ३.५०० किलोमीटर पर्यंतचे लक्ष उद्ध्वस्त केले आहे. अशा प्रकारची चाचणी केल्या आहेत.
क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून अण्वस्त्रे जमिनीवरुन हवेतून लढाऊ विमानांच्या माध्यमातून आणि समुद्रातून पाणबुड्यांच्या साह्याने डागण्याच्या तिहेरी क्षमतेला न्युक्लिअर ट्राएड असे म्हणतात. भविष्यात पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ल्याचा विचार करु शकणार नाही.
जर पाकिस्तानने तसे केले तरी के-१५ एसएलबीएम लाँच केल्यानंतर भारताने आपल्या विशाल समुद्रातून कोठूनही हल्ला केला तर, संपुर्ण पाकिस्तान एका झटक्यात उद्ध्वस्त होईल. एवढी क्षमता आहे. या पाणबुडीत यामुळे पाकिस्तान आणि चीनला चांगलीच धडकी भरली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवक