गोल पोस्ट स्पॉटलाइट आता रजनीकांत मॅन vs वाईल्ड मध्ये

आता रजनीकांत मॅन vs वाईल्ड मध्ये

कर्नाटक: साऊथचा सुपरस्टार रजनीकांत बेअर ग्रिल्सच्या शो मॅन vs वाइल्डमध्ये दिसणार आहे. कर्नाटकच्या वनविभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या कार्यक्रमाचे शूटिंग कर्नाटकच्या बांदीपूर फॉरेस्टमध्ये होणार आहे.

शूट पुढील तीन दिवस असेल. त्याठिकाणी शूटिंगसाठी परवानगी देण्यात आली आहे. रजनीकांत आणि बेअर ग्रिल्स बांदीपूर फॉरेस्ट आणि निसर्ग विषयी चर्चा करतील. सोमवारी रात्री ९.३० वाजता बेअर ग्रिल्स गुंडलुपेट गावात पोहोचतीली. रजनीकांत बांदीपुरच्या बाहेर रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. बेअर ग्रिल्सकडे १८ जणांचा दल आहे. विभागाने सर्व लोकांसाठी वाहने दिली आहेत.

रजनीकांतच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी शोमध्ये दिसले होते. पीएम नरेंद्र मोदी १२ ऑगस्ट २०१९ रोजी बेअर ग्रिल्सच्या प्रसिद्ध ‘मॅन vs वाइल्ड’ या शोमध्ये दिसले. पीएम मोदीबरोबर मॅन vs वाइल्डच्या या भागाचे चित्रीकरण उत्तराखंडच्या जिम कार्बेटच्या जंगलात झाले आहे. हा कार्यक्रम जगातील सर्वात ट्रेंडिंग टेलिव्हिजन कार्यक्रम आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version