आता इलेक्ट्रिक वाहने चार्ज करणं झालं सोपं, 500 शहरांमध्ये उघडले इंडियन ऑइलचे चार्जिंग स्टेशन

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2022: देशाच्या कानाकोपऱ्यात पेट्रोल पोहोचवणारी इंडियन ऑइल कंपनी आता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनच्या सेगमेंटमध्ये मोठी तयारी करत आहे. कंपनीने देशातील 500 शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उघडले आहेत.

आतापर्यंत 1000 चार्जिंग स्टेशन उघडण्यात आले आहेत

इंडियन ऑइलच्या विधानानुसार, कंपनीने आता 1,000 हून अधिक चार्जिंग स्टेशन सुरू केले आहेत. तर येत्या तीन वर्षांत 10,000 हून अधिक पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की ही चार्जिंग स्टेशन्स देशातील 500 शहरांमध्ये काम करू लागली आहेत. त्याचबरोबर महामार्गावर काही चार्जिंग स्टेशनही बसवण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरच सुमारे 3000 चार्जिंग स्टेशन तयार करण्याची कंपनीची योजना आहे.

9 मोठ्या शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन 2.5 पट वाढले आहेत

एवढेच नाही तर ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील 9 प्रमुख शहरांमध्ये सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनच्या संख्येत 2.5 पट वाढ झाली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, सुरत, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू आणि हैदराबादचा समावेश आहे.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये देशात 678 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स होती, आता त्यांची संख्या जानेवारी 2022 मध्ये 1640 झाली आहे. या 9 शहरांमध्ये 940 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा