आता पुरंदर मध्येच होणार कोरोनाची टेस्ट

7

पुरंदर, दि. १६ जून २०२०: पुरंदर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाचा आता कोरोना चाचणी करण्याची सोय पुरंदर मध्येच उपलब्ध होणार आहे. सासवड येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती डॉ.अमोल हेंद्रे यांनी दिली आहे.

पुरंदर मध्ये आत्तापर्यंत २१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर अनेक संशयितांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या सर्व रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे शासकीय किंवा खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात होते. मात्र अंतर जादा व तिथे असलेली गर्दी पहाता चाचणीचा अहवाल उशीरा मिळत आहे. पुण्यातील खाजगी प्रयोगशाळेतील चाचणीसाठी लोकांना जास्त पैसे द्यावे लागत होते. आता पुरंदरमध्येच थायरोकेअर लॅबच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या चाचणी केंद्रात केल्या जाणाऱ्या टेस्ट या शासनाने ठरवून दिलेल्या दराने केल्या जाणार आहेत. टेस्टसाठी २२०० रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी जावून स्वॅब घेऊन केलेल्या चाचणीसाठी २८०० रुपये आकारण्यात येणार आसल्याची माहिती डॉ.अमोल हेन्द्रे यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा