मुंबई, ९ ऑगस्ट २०२२: अखेर आज शिंदे गट आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात झाली. मंत्रिपदं घोषित झाली नसली तरी शपथ वीथी आज पार पडला. यात संजय राठोड यांना देखील शपथ देण्यात अली. संजय राठोड पुण्यातील तरुणीने केलेल्या आत्महत्ये प्रकरणी चर्चेत राहिले होते. यावरून चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना घेरलं होतं. संजय राठोड शिवसेनेत असताना हे प्रकरण समोर आलं होतं. त्यावर भाजपने राजीनामा देण्यासाठी दबाव आणला होता. मात्र आता तेच संजय राठोड शिंदे-भाजप सरकार मध्ये मंत्री बनणार आहेत.
यावर आता किशोरी पेढणेकर यांनी चित्रा वाघ यांना टोला लावला आहे. शपथ विधी झाल्यावर पेढणेकर म्हणाल्या की, “एकाचं मंत्रिपद घालवलं. त्या मुलीच्या प्रकरणावरून किती रान उठवलं, आता कुठं आहेत त्या आमच्या चिवा ताई, नंतर ते चंद्रकांत पाटील कुठं आहेत ते देखील बघावं लागेल. ज्या मंत्र्यांचा विरोध केला होता त्याच मंत्र्यांना मांडीवर घेता याचा अर्थ काय समजायचा. त्यामुळं जे होतंय ते जनता बघतेय आणि काउंट करतेय.”
चित्रा वाघ यांचं प्रतिउत्तर
यावर प्रतिउत्तर देत चित्रा वाघ यांनी म्हंटलं की, “माजी मंत्री संजय राठोड याचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा अतंत्य दुर्दैवी असा आहे. संजय राठोड हा मंत्री झाला असला तरी त्याच्या विरुद्धचा माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे. न्याय देवतेवर मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळं येण्याऱ्या दिवसात पुन्हा एकदा लढेंगेभी और जितेंगेभी.” चित्रा वाघ यांनी ट्विट करून देखील आपला संताप व्यक्त केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे