मुंबई, १३ ऑगस्ट २०२०: अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या चौकशीची मागणी वाढत आहे. जेव्हा सुशांतच्या बहिणीने सीबीआयच्या तपासासाठी मागणी सुरू केली, तेव्हा राजकारणालाही सुरुवात झाली. या प्रकरणी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना समोरासमोर आहेत आणि एकमेकांवर राजकीय बाण सोडले जात आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीका करत भाजप नेते शाहनवाज हुसेन म्हणाले, “संजय राऊत जी, न्याय देण्यासाठी आपण उशीर केला! आता तुम्ही म्हणत आहात की सुशांत सिंग राजपूत यांच्या परिवारातील सदस्यांनी शांत राहावे जेणेकरून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल. आता तुम्हीच शांत रहा, सीबीआय न्याय देईल.”
सुशांत प्रकरण सीबीआय चौकशीवरून वादात आहे, ही चौकशी झाली पाहिजे अशी सुशांतच्या कुटुंबाची इच्छा आहे. न्यायासाठी असे करणे आवश्यक आहे असे भावनिक आवाहन करीत सुशांतची बहीण श्वेताने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. अमेरिकेत राहणा-या श्वेताला आपला भाऊ गमावल्यामुळे एकाकी वाटत असल्याची भावना तीने व्यक्त केली आहे. तसेच सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा असे देखील तिने म्हटले आहे.
सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेताने हा ४३ सेकंदाचा व्हिडिओ सामायिक केला आहे. “हृदय पिळवटून निघाले. न्यायप्रक्रिया सुद्धा लांबणीवर पडत आहे. या प्रकरणात नि:पक्षपाती न्याय होणे गरजेचे आहे. सत्य सर्वांसमोर आलेच पाहिजे,” असे ती वारंवार हात जोडून विनंती करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी