भारत बायोटेक ने बनवली कोरोनावर नोझल व्हॅकसिन, चाचणीस मागितली परवानगी

नवी दिल्ली, ८ जानेवारी २०२१: कोरोना लसीसंदर्भात भारतात आणखी एक पाऊल उचलले गेले आहे. भारत बायोटेकने देशातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडे प्रस्ताव पाठविला आहे, ज्यात कोरोना लस मधील नोझल व्हॅकसिनसाठी परवानगी मागितली आहे.

जर नोझल व्हॅकसिन चाचणी यशस्वी झाली तर देशात कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या युद्धामध्ये मोठे यश मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे ही लस खांद्यावर इंजेक्शन च्या सहाय्याने दिली जात नाही. तर हीलस. नाकातून दिली जाते. नाकातून दिली जाणारी लस अधिक प्रभावी असते, असे अभ्यासातून देखील दिसून आले आहे.

भारत बायोटॅक यांनी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने नोझल व्हॅकसिनवर संशोधन केले आहे आणि ही लस तयार केली आहे. अशा परिस्थितीत भारतात पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील चाचण्यांसाठी कंपनीने परवानगी मागितली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्यांची चाचणी नागपूर, भुवनेश्वर, पुणे आणि हैदराबादसारख्या शहरात केली जाईल.

माहितीनुसार १८ ते ६५ वर्षांपर्यंतच्या लोकांना या लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून घेतले जाईल, जेणेकरुन चाचणी यशस्वीरित्या चालवता येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा