दौंड : केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दौंड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे, वंचीत बहुजन पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंद या हाकेला शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला.
यावेळी शहरात मोर्चा काढून पोलीस स्टेशनच्या आवारात निषेध सभा घेण्यात आली यावेळी भारिप बहुजन महासंघाचे महिला शहराध्यक्ष दीपाली ताई बोराडे, वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी निषेध व्यक्त केला.
शहराध्यक्ष अनिकेत मिसाळ, अजिंक्य गायकवाड जिल्हा सचिव निर्मला रंधवे, दीपक भाऊ निकाळजे प्रतिष्ठानचे सचिन खरात,राहुल नायडू, अक्षय शिखरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दौंड पोलिस स्टेशनचे पीआय महाडिक साहेब यांना निवेदन देण्यात आले. बंद शांततेत पार पाडणे साठी शहरात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.दरम्यान बंद चे आवाहन एक दिवस आधी पत्रक वाटून करण्यात आल्याने शहरातील जवळपास सर्वच व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिला आहे.