न्यूड फोटोशूट … सौंदर्यांची नवी व्याख्या…

11

पुणे, १९ जुलै २०२२: फोटोसेशन.. प्रीवेडिंग फोटोसेशन, मॅरेज फोटोसेशन, यानंतर आता न्यूड ( नग्न ) फोटोसेशन सध्या जोरदार चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील कलाकारांनी न्यूड फोटोसेशन केले. ज्यामुळे कायमच वादात राहिले.

हॉलिवूडमध्ये मर्लिन मन्रो, अमेरिकन नटी, जीचे अस्तित्व कायम वादग्रस्त ठरले. राष्ट्रपती जॉन केनेडी आणि नंतर जॉन केनेडी यांचे भाऊ जनरल रॉबर्ट केनेडी यांच्याबरोबर तिचे संबंध असल्याचे तिने जगजाहीर केले होते. मर्लिन मन्रो हिचे फोटोशूट आणि आयुष्य कायम विवादात राहिले. त्यातही रात्री झोपतानादेखील ती नग्नपणे झोपत असल्याचं तिने कबूल केलं होतं.

पॉप सिंगर शकीरा आणि लेडी गागा यांनी देखील न्यूड फोटोशूट करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मिशेलिना ओलाझानस्का या अभिनेत्रीदेखील न्यूड फोटोशूट करुन रसिकांना घायाळ केले.
न्यूड फोटोशूटचा ट्रेंड आता पुन्हा रुजू होत आहे. ज्यात कमनीय बांधाच नव्हे तर अतिशय स्थूल व्यक्तींनी न्यूड फोटोशूट केल आहे. यात मराठी अभिनेत्री वनिता खरात हिचे न्यूड फोटोशूटही वादग्रस्त ठरले. तब्बल १०० किलो वजनाच्या वनिताने न्यूड फोटोशूट केल्याचं अभिमानाने सांगितलं. सई ताम्हणकर आणि राधिका आपटे यांनीही आपल्या फोटोशूटमुळे वादाला निमंत्रण दिलं होतं.

न्यूड या चित्रपटाने मराठी सिनेमासृष्टीत वादंग माजवला होता. छाया कदम हिने यात अभिनय केला होता. तेव्हाही असाच वादंग माजला होता.
बॉलिवूडमध्ये अभिनेता राहुल खन्ना यानेही न्यूड फोटोशूट केले. यावेळी केवळ एका उशीच्या सहाय्याने त्याने अंग प्रदर्शन केले.
वास्तविक न्यूडफोटोशूट हा नवीन प्रकार नाही. मौर्य काळात कमनीय बांध्याच्या युवतींना राजे- महाराजे यांच्याकडून कायम मागणी होती. त्याचबरोबर सध्या कलाविद्यालयात हा एक विशेष अभ्यासप्रकार मानला जातो. त्यामुळे सध्या कमनीय बांधाच नव्हे तर कुठल्याही शरीरयष्ठीला फोटोशूटसाठी मागणी आहे, हे खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा