गोल पोस्ट आरोग्य अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह आणि निगेटिव्ह रुग्णांची संख्या

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह आणि निगेटिव्ह रुग्णांची संख्या

अहमदनगर, दि. २० मे २०२०: अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही काही दिवसांपूर्वी आटोक्यात येत असल्याचे दृष्ये जिल्ह्यात पाहण्यास मिळत होते. पण आता संपुर्ण जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे असे चित्र पाहण्यास मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी एक रूग्ण पॉझिटिव्ह आल्यामूळे आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही ६६ वर जाऊन पोहचलेली आहे असे चित्र अहमदनगर जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

जिल्हात कोरोनामुळे ५ नागरिकांचा मृत्यू झालेला असुन, कोरोना या महाभयंकर संकटातून बाहेर पडलेल्या रूग्णची संख्या ४९ आहे. ज्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत असे एकूण १२ रूग्ण जिल्ह्यातील रूग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हातील काही तालुक्यात अद्याप एकही कोरोनाचा रूग्ण सापडलेला नाही असा तालुका म्हणजे कर्जत श्रीगोंदा होय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version