औरंगाबाद, 9 जून 2022: उद्धव ठाकरेंनी नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध केला. ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांनी कधीही इस्लामचा द्वेष करण्यास सांगितले नाही. भाजपने गुन्हा केला असेल तर देशाची माफी कशाला मागायची, असेही ते म्हणाले. भाजपच्या कृत्याची देशाला लाज वाटली आहे. छत्रपती शिवाजींनीही कुराणाचा आदर केला. आम्ही इतर धर्मांचा द्वेष करत नाही, हे आम्ही शिकवले आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब म्हणायचे की, धर्म घरात ठेवा. धर्मांधतेच्या नावाखाली कोणी हल्ला केला तर त्याला आम्ही सोडणार नाही.
भाजप प्रवक्त्याने प्रेषित मोहम्मद यांचा केला अपमान
भाजपच्या प्रवक्त्याने पैगंबरांचा अपमान केल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. जसा आपल्या देवाचा अपमान होता कामा नये तसाच त्यांच्याही देवाचा अपमान का करताय? कचरापेटीवर पंतप्रधानांचा फोटो लावण्यात आला होता. अपमान झाल्यामुळं मध्यपूर्वेतील देशांपुढं भारताला गुडघे टेकावे लागल्याचं ठाकरे म्हणाले.
गुन्हा केला भाजपने तर देशाने माफी का मागावी?
हा अपमान आपण सहन करत आहोत, असं ते म्हणाले. गुन्हा केला भाजपने तर देशाने माफी का मागावी? ठाकरे म्हणाले की, भाजपच्या छोट्या मोठ्या प्रवक्त्यांनी गुन्हा केलाय. भाजपचा प्रवक्ता देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही.
विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की, काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडण्याशिवाय पर्याय नाही आणि भाजप गप्प बसलाय. हिंमत असेल तर तुम्ही काश्मीरमध्ये जा आणि तिथं हनुमान चालिसाचं पठण करा, असं मुख्यमंत्री म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे