वडगाव मावळ, २४ सप्टेंबर २०२३ : हे गणराया.. गोपीचंद पडळकर यांना सद्बद्धी दे! असे साकडे वडगावमधील जय बजरंग तालीम मंडळाच्या मानाच्या गणपतीला घालत, पडळकरांनी बडबड करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्तृत्वाचे अनुकरण करून विकासाची स्पर्धा करावी, अशी प्रार्थना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह पदधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले.
खांडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेब कारके, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका युवक अध्यक्ष किशोर सातकर, उपाध्यक्ष चंद्रकांत दाभाडे, संदीप आंद्रे, विकी लोखंडे, पंढरीनाथ ढोरे, माजी नगरसेवक सुनील ढोरे, शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, सुनील दाभाडे, सुहास गरुड, भानुदास जांभूळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गोपीचंद पडळकर हे निवडणूकीत पराभूत झाल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. त्यांनी स्वतःचा आवाका पाहून टीका टिप्पणी करावी, अजित पवार यांच्या कामाची सुरुवात सकाळच्या रामप्रहरी होते. तसेच ते विकासकामात मग्न असतात, मात्र गोपीचंद पडळकर यांच्यासारखा वाचाळवीर राज्याने पाहिला आहे, असा टोला गणेश खांडगे यांनी लगावला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर