गोल पोस्ट आरोग्य ओडिशा सरकार उभारणार देशातील सर्वात मोठे रुग्णालय

ओडिशा सरकार उभारणार देशातील सर्वात मोठे रुग्णालय

ओडिशा : जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या करोना व्हायरसचा धोका देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ओदिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे. अशी माहिती ओडिशा सरकारकडून देण्यात आली आहे. या भव्य रुग्णालयात तब्बल एक हजार खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

ओडीसा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून एक हजार खाटांची व्यवस्था असणारे हे देशातील पहिले भव्य असे ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.

ओडीशा सरकार या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी तयारीला लागले आहे. ओडीसा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून एक हजार खाटांची व्यवस्था असणारे हे देशातील पहिले भव्य असे ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version