गोल पोस्ट महाराष्ट्र नगर जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह: जिल्हाधिकारी

नगर जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह: जिल्हाधिकारी

अहमदनगर : कोरोना विषाणुचा नगरमध्ये आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. हा रुग्ण दुबईहून नगरमध्ये आला होता. हा रुग्ण ग्रामीण भागातील असून, तिच्यावर विलिगिकरण कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
हा रुग्ण ३ मार्चला दुबईवरून आला होता. त्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या रुग्णाला आता बुथ रुग्णलयात ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत ६३ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात दोन पॉझिटिव्ह आले आहे. पाच जणांचा अहवाल येणे बाकी आहे.
त्यामुळे नगर जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहे. जिल्हा प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसापासून ६३ रुग्णांची तपासणी केली आहे.
गेल्या आठवड्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नगरमधील कोरोनाग्रस्तांची संख्या दोन झाली आहे. हा दुसरा रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आला याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार आरोग्य पथके काम करणार आहे, असेही सांगण्यात आले.त्यामुळे कोणीही या काळात बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version