परिस्थितीला कंटाळून पुण्यातील नृत्यागंनेनं केली आत्महत्या

7

पुणे, ७ ऑक्टोंबर २०२०: कोरोना महामारीमुळं राज्यात अनेक क्षेत्रातील कलाकारांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळं अक्षरशः अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळं आपलं जीवन संपवण्याजोगी त्यांना दुसरा पर्यायच भेटला नाही. अशीच दुर्दैवी आणि दुःखद घटना पुण्यात घडली आहे.

परिस्थितीला कंटाळून पुण्यात अवघ्या २१ वर्षीय लोककलावंत व नृत्यागंनेनं आत्महत्या केली. प्रसिद्ध नृत्यागंना प्रियंका काळे यांची बहिण आणि नृत्यागंना विशाखा काळे हिनं राहत्या घरी आत्महत्या केलीय. महाराष्ट्राची गौरव गाथा, महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र, आई जिजाऊ आणि लावणी आदी कार्यक्रमात त्यांनी काम केले होते. घरी अंध आई-वडील तर कोरोनामुळे सहा महिन्यांपासून काम नसल्यामुळं तिनं हे टोकाचं पाऊल उचललं.

आधीच या महामारीमुळं हातावर पोट असलेल्या कलावंताची अंतत्य दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी बर्याच वेळा आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचं आणि परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न केले पण, सरकारनं अजुनही दखल घेतली नाही, आणि पुढं ही जर दखल घेतली नाही तर मग किती कलावंत असं टोकाचं पाऊल घेतील हे सांगता येणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा