ठाणे शहर पोलिसांची अधिकृत वेब साईट हॅक, देशातील मुस्लिमांची माफी मागावी, हॅकरने केली मागणी

3

ठाणे, 14 जून 2022: ठाणे शहर पोलिसांची अधिकृत वेब साईट हॅक करण्यात आलीय. वेबसाइट लाँच होताच, “Hacked by One Hat Cyber ​​Team” असे शब्द दिसतात. मिळालेल्या माहितीनुसार, वेबसाइट हॅक करणाऱ्या हॅकरने भारत सरकारसाठी एक संदेश लिहिला आहे. या मेसेजमध्ये हॅकरने मुस्लिमांची माफी मागण्यास सांगितलं आहे.

किंबहुना, गेल्या काही काळापासून देशात मंदिर-मशीद मुद्दा चांगलाच तापला आहे. तसेच प्रेषित मुहम्मद यांच्यावरील टिप्पणी प्रकरणामुळं देशात अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांच्यासह मुस्लिम समाजातील दिग्गजांनी देशात मुस्लिम असुरक्षित असल्याचे म्हणणे सुरू केले आहे.

देशातील मुस्लिमांची माफी मागावी

ठाणे शहर पोलिसांच्या वेब साईट वर अशा प्रकारचा संदेश देण्यात आलाय. हॅक करणाऱ्या व्यक्तीने लिहील की, “भारत सरकार, तुम्ही इस्लामच्या संदर्भात वारंवार अडथळे आणता, तुम्हाला सहिष्णुता दिसत नाही, जगातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.”

नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या वर वादग्रस्त विधान केल्यामुळं देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगातून याचे पडसाद उठत आहे. अनेक मुस्लिम देशांनी देखील या वक्तव्यावर आपला निषेधनोंदवला आहे. देशात अनेक ठिकाणी यावरून दंगली देखील पाहायला मिळाल्या.

जावेद पंपाच्या घरावर बुलडोझर

मुहम्मद पैगंबर प्रकरणात उत्तर प्रदेशात कडक कारवाई करण्यात येत आहे. प्रयागराज हिंसाचाराबद्दल बोलताना या संपूर्ण गोंधळामागे जावेद पंपाचं नाव पुढं आलं, त्यानंतर प्रयागराज पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचवेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी जावेद पंप याच्या घरावर बुलडोझरची कारवाई करून त्यांचं घर पूर्णपणे जमीनदोस्त केलं. यावर असुद्दीन ओवेसी चांगलेच संतापलेले दिसले. ते म्हणाले, कोर्टाला कुलूप लावा.न्यायाधीशांना कोर्टात न येण्यास सांगा. दोषी कोण हे मुख्यमंत्री ठरवणार असल्याने न्यायालयाची काय गरज?

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा